भोळे कुटुंबियांच्या मारेकर्‍यांना अटक करा !

0

जळगाव। तालुक्यातील भादली गावात भोळे कुटुंबियांची रविवारी मध्यरात्री हत्या केल्या नंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली. या निर्दयी हल्लेखोरांनी दोन लहान चिमुरड्यांचाही जीव घेतल्याने गावकरी संतप्त झाले होते. अखेर सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास मृतदेहांना जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदना साठी दाखल करण्यात आले. मात्र, हल्लेखोरांचा तपास करून अटक करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे गावकर्‍यानी पावित्रा घेतला. यानंतर पोलीस अधिकार्‍यांनी त्यांची समजूत घातल्यानंतर वाद निर्वळला. यानंतर मृतदेह दुपारी धुळे येथे इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात तणाव
एकाच कुटुंबातील चार जनाची हत्या झाल्या नंतर पूण परिवारच उध्वस्त झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. भोळे कुटुंबावर झालेला मोठा आघात असल्याचे जिल्हा रुग्णालयात उपस्थित भादली वासीयांनी बोलून दाखविले. दरम्यान जिल्हा रुग्णालयात आरोपी पकडल्या शिवाय अत्यंसंस्कार करणार नसल्याचे पवित्रा घेत गावकर्‍यांनी एकच गोंधळ घातला. तसेच संशयितांना अटक करण्यात यावी. धुळे येथे हिरे मेडिकल येथे मृत देहांचे शव विच्छेदन करण्याची मागणी करण्यात आली होती. जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रूग्णालयात गावकर्‍यांसह नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती.

न्यायासाठी प्रयत्न करणार
दुर्दैवी अशी घटना भादली गावात घडली आहे. एकूण चार हत्या झाल्या असल्याने तपासाला गती देण्याची मागणी पोलीस प्रशासनाला करणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना भेटून या प्रकरणाला लवकर न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, तपासात जे सत्य आहे. ते बाहेर येणार असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले आहे. जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचे पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याचे यावेळी गर्‍हाणे मांडण्यात आले. घटनेची माहिती यावेळी त्यांनी घेतली. भादली येथे घटनास्थळी देखील पाहणी आमदार खडसे यांनी केली आहे.