भोळे महाविद्यालयात मेरी माटी मेरा देश कार्यक्रम साजरा

भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात आज दिनांक 13/09/2023 रोजी राष्ट्रीय सेवा योजना एकाकाच्या वतीने *मेरी माटी मेरा देश* अंतर्गत अमृत कलश संकलन चे उदघाटन प्राचार्य डॉ राजू फालक यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळी त्यांना अमृत कलश संकलन ची पार्श्वभूमी समजावून सांगितली आणि माती संकलन करताना सेल्फी घेऊन तो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करिता कसा अपलोड करायचा याचे प्रात्यक्षिक सुद्धा दिले. आणि संकलन केलेल्या मातीतून महाविद्यालयात अमृत वाटिका बनविण्याचे सर्वांना आवाहन केले. त्याप्रसंगी प्राचार्य डॉ.आर पी फालक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर बी ढाके सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.जगदीश चव्हाण विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डॉ.अनिल सावळे प्रा.संगीता धर्माधिकारी प्रा. डॉ.माधुरी पाटील प्रा. डॉ.जयश्री सरोदे प्रा. जी.पी वाघुळदे प्रा. खिलचंद धांडे उपस्थित होते असे प्रसिद्धी प्रमुख डॉ. संजय चौधरी कळविले.