भोळे महाविद्यालयात रॅगिंग विरोधी कायदा व सायबर क्राईम कायदा साक्षरता कार्यशाळा संपन्न

भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात रॅगिंग विरोधी समिती अंतर्गत दिनाक 29 ऑगस्ट 2023 मंगळवार रोजी सकाळी 10.30 वाजता *रॅगिंग विरोधी कायदा व सायबर क्राईम कायदा साक्षरता कार्यशाळा* आयोजित करण्यात आली यावेळी व्यासपीठावर

*प्रमुख व्यक्ते – प्रा डॉ दयाधन राणे

रोटरीयन व माजी जळगाव जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव

कार्यक्रम अध्यक्ष मा.प्राचार्य राजू फालक

उपाध्यक्ष प्राचार्य परिषद जळगांव

माजी सेनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य क ब चौ उंमवी जळगांव

प्रा डॉ संजय चौधरी

सदस्य – आंतर विद्याशाखा शैक्षणिक परिषद क ब चौ उ म वि जळगांव

प्रमुख -रॅगिंग विरोधी आयोजन समिती

उपस्थित होते

*प्रा डॉ दयाघन एस राणे* – यांनी रॅगिंग कायदा व त्यावर उपाय विषद केले त्यांनी रॅगिंग मुळे कशी करियर बरबाद होऊ शकते याची उदहरणे देऊन सविस्तर माहिती दिली तसेच सायबर क्राईम कसा होतो त्याबद्दल माहिती दिली, फेसबुक फेक अकाउंट कसे ओळखाल, त्याद्वारे ब्लॅक मेलिंग कशी केली जाते, फिशिंग कशी होते, हॅकिंग, या बद्दल GNTC नावाच्या चित्रपटातील प्रसंग सांगून सदर चित्रपट प्रत्येकाने पाहिल्यास ह्या माध्यमातून होणारी फसवणूक आणि त्या मधून कसे बाहेर पडता येईल जे कळेल म्हणून तो पहावा, असे आवाहन केले

*प्राचार्य डॉ राजू फालक* – रॅगिंग बद्दल बोलताना सांगितले की कला वाणिज्य विज्ञान महावि्दयालयात शक्यतो रॅगिंग प्रकार फारसे अनुभवास येत नाही परंतु प्रोफेशनल महाविद्यालयात रॅगिंग प्रकार खूपच आढळून येतात त्यावर कठोर उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत याची जाणीव ठेवून वर्तन करावे. विद्यार्थ्यांनी बिना ओळखीचे फोन उचलताना काळजी घ्यावी ते लोक आमिष दाखवून आपल्याला फसवित असतात, कोणीही किती ही श्रीमंत असला तरी आपले पैसे कुणालाही फुकट देते नाही. तसेच दाम दुप्पट देतो सांगून किंवा लॉटरी लागली सांगून फसवणूक होत आहे ओ टी पी देताना काळजी घ्यावी असे मार्गदर्शन केले

सूत्रसंचालन प्रा संगीता धर्माधिकारी प्रास्ताविक प्रा आर डी भोळे आभार प्रा डॉ जे बी चव्हाण यांनी केले

प्रा डॉ अनिल सावळे, प्रा डॉ एस व्ही बाविस्कर, प्रा डॉ जयश्री सरोदे, प्रा डॉ अंजली पाटील, प्रा डॉ माधुरी पाटील प्रा निर्मला वानखेडे, प्रा अनिल नेमाडे प्रा एस डी चौधरी प्रा श्रेया चौधरी, प्रा. एस. एस. पाटील प्रा डॉ जी पी वाघुलदे प्रा डॉ आर बी ढाके

सर्व विद्यार्थी, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्व रॅगिंग विरोधी आयोजन समिती सदस्य यांनी सहकार्य केले