जीवन जगताना उच्च ध्येय गरजेचे -संशोधक डॉ.निवृत्ती बर्हाटे
भुसावळ- दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन अमेरीकेतील संशोधक डॉ.निवृत्ती बर्हाटे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. विज्ञान मंडळ समिती प्रमुख समिती सदस्य डॉ.जी.पी.वाघुलदे यांची उपस्थिती होती. डॉ.निवृत्ती बर्हाटे यांनी जीवनात कसे यशस्वी व्हावे या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, जीवन जगताना उच्च ध्येय असणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्दिष्टे, स्वप्ने, एकाग्रता, दृष्टीकोणाबाबतचे विविध दाखले त्यांनी देत विज्ञान व जीवन यांची सांगड घालून यश कसे संपादित करावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.फालक यांनी विज्ञान व स्पर्धेच्या युगात सुखमय,
आनंदी, निरामय जीवन जगायचे असेल तर जीवनात ज्ञानाची व विज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे, असे सांगितले. प्रास्ताविक डॉ.जी.पी.वाघुलदे तर सूत्रसंचालन प्रा.अंजली पाटील व आभार प्रा.माधुरी पाटील यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
प्रा.माधुरी पाटील, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.अंजली पाटील, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.एस एस.पाटील, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.अनिल नेमाडे, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.अनिल सावळे, डॉ.भारती बेंडाळे व प्राध्यापक वृंद, विद्यार्थिनी-विद्यार्थिनी उपस्थित असल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.