भोळे महाविद्यालयात वैद्यकिय तपासणी शिबिर संपन्न

भुसावळ प्रतिनिधी दि 3

येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात आज दिनांक 03 ऑक्टोंबर 2023 वैद्यकिय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले यात कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मार्गदर्शक तत्वानुसार

कला वाणिज्य व विज्ञान शाखेच्या पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनी ची आरोग्य तपासणी करणे गरजेचे असते यामध्ये विद्यार्थ्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेतली जाते त्यात रक्त भिसरण संस्था, श्वसन संस्था, त्वचा, पोट, कान, नाक घसा, डोळे, दंतविकर, आदी तपासण्या करून विद्यार्थ्यांचे विविध आजारांशी संबधित सर्व शंकांचे निरसन केले व उपाय सांगितले, आरोग्य शिबिरासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी उपस्थिती दिली, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजू फालक यांच्या अध्यक्षतेखाली झाली तपासणीसाठी शहरातील डॉ. मिलिंद पाटील जनरल सर्जन, स्रीरोगतज्ञ डॉ जान्हवी पाटील, नेत्ररोगतज्ञ डॉ. धैर्यसागर राणे, दंतचिकित्सक डॉ. रीना पाटील, यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करून मार्गदर्शन केले या शिबिरासाठी 337 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला

सदर शिबिरासाठी वैद्यकीय समिती प्रमुख प्रा. डॉ. जी पी वाघुळदे, प्रा. डॉ. जे पी सरोदे, प्रा.डॉ. ए आर सावळे, प्रा. एस डी चौधरी, प्रा. श्रेया चौधरी, प्रा. संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.अंजली पाटील,प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ. जगदीश चव्हाण,प्रा. डॉ. संजय चौधरी, प्रा. आर डी भोळे, प्रा. एन एस वानखेडे, प्रा. डॉ. डी एस राणे,प्रा.दीपक जैस्वाल,प्रकाश चौधरी, दीपक महाजन, प्रकाश सावळे यांनी परिश्रम घेतले