” भोळे महाविद्यालयात शिक्षक- पालक सहविचार सभा संपन्न” 

भुसावळ येथील , दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात दि.१२ ऑगस्ट २०२३ रोजी शिक्षक- पालक सहविचार सभा संपन्न झाली याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर पी फालक हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी समिती चेअरमन डॉ संजय बाविस्कर उपस्थित होते सर्व प्रथम या सहविचार सभेचे प्रास्ताविक डॉ संजय बाविस्कर यांनी केले श्री सरस्वती ईशस्तवन घेऊन कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला नंतर व्यासपीठ मान्यवरांचे परिचय – स्वागत करुन आलेल्या पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.सहविचारसभेत पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले यात प्रातिनिधिक स्वरूपात श्री. अजय पितांबर भालेराव तर संजय पिंपरे यांनी महाविद्यालयाविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.या कार्यक्रमाचे औचित्य साधतांना महाविद्यालयातील विविध विषय प्राध्यापकांनी पीएचडी पदवी संपादन केली. यात प्रामुख्याने प्रा.माधुरी पाटील यांनी” फायटो सोश्युओलॉजिकल स्टडीज ऑन सातपुडा फॉरेस्ट रेंजेस वुईथ स्पेशल रेफरन्स टू मनुदेवी , पाल ऍंड वैजापूर फॉरेस्ट रेंजेस ऑफ जलगांव डिस्ट्रिक्ट” ,प्रा. अंजली पाटील यांनी ” दी प्रॉब्लेम ऑफ अपारर्थाइड इन दी सिलेक्ट नॉवेल्स ऑफ जे.एम.कोईक्झी ” प्रा अनिल सावळे यांनी ” टू स्टडी दी व्हॅल्यू ऑफ पर्सनॅलिटी पटर्न वर्किंग ऍन्ड नॉनवर्किंग वूमन इन अर्बन ऍन्ड रुरल एरिया “या प्राध्यापकांनी आपापल्या विषयांत पीएचडी पदवी मिळविल्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य मा डॉ आर पी फालक यांचे हस्ते सन्मानार्थ गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना डॉ आर पी फालक यांनी महाविद्यालयाविषयी आपली भूमिका मांडतांना महाविद्यालयाने आजपर्यंत केलेली प्रगती आणि झालेला विकास याबद्दल माहिती देतांना महाविद्यालयाचा लेखाजोखा मांडला तर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा, लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन त्यासाठी आवश्यक पुस्तकांचा उपलब्ध साठा या अशा अनेक प्रकारच्या शैक्षणिक सोयी सुविधांची माहिती दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ माधुरी पाटील यांनी तर आभार डॉ जयश्री सरोदे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पालक – शिक्षक समिती सदस्य आणि महाविद्यालयीन प्राध्यापक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले असे प्रा डॉ संजय चौधरी यांनी कळविले आहे