दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात आज दिनांक 05/09/2023 रोजी सकाळी 11 वा. शिक्षक दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्राचार्य डॉ.आर पी फालक यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला. त्याप्रसंगी भुसावळ बँक ऑफ महाराष्ट्र चे सिनियर मॅनेजर गुलशन कुमार गौरव हे उपस्थित होते याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष *प्राचार्य डॉ. आर. पी. फालक* – शिक्षणाशिवाय कोणताही व्यक्ती आपले ध्येय गाठू शकत नाही. ते म्हणतात की व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षणाचे खूप असे अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान आहे.
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बद्दल सांगायचं झालं तर त्यांचा जन्म 5 सप्टेंबर1888 मध्ये मद्रास येथील तिरुवल्लुर या गावी झाला.
ते स्वतंत्र भारतातील पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. देशाचे राष्ट्रपती होण्यापूर्वी ते एक नामांकित शिक्षक तज्ञ होते त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय असे योगदान दिले. आज येथे जमलेल्या सर्व उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना असे वाटत असेल की या शिक्षक दिनाचे काय महत्त्व आहे आपण शिक्षक दिन का साजरा केला पाहिजे. तर भारतात प्राचीन काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे गुरु म्हणजे शिक्षक. शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्याला त्याच्या आयुष्यात तो सर्व संकटांना कसे सामोरे जाईल याचे शिक्षण देत असतो.शिक्षक हा त्याचा भविष्याचा निर्माता असतो. शिक्षणामुळे व्यक्ती आज समाजामध्ये उच्च ठिकाणी पोहोचू शकतो याचे सर्व श्रेय शिक्षकाला जाते.शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला, त्याच्या जीवनाला योग्य ती वळण लागते.
ज्याप्रमाणे कुंभार आपल्या मडक्याला आकार देऊन योग्य प्रकारे घडवत असतो. त्याचप्रमाणे शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असतात. त्यांच्या भविष्याला आकार देत असतो. वर्गात तासन्तास उभे राहून घसा कोरडा होईपर्यंत चा निर्मल भावनेने शिक्षक हे आपल्या ज्ञानदानाचे कार्य करत असतात.
शिक्षक म्हणजे कोण तर शिक्षक म्हणजे असत्या कडून सत्याकडे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ शिक्षक हे नेहमी विद्यार्थी यान सोबत असतात.नवनवीन ज्ञान संकल्पना जाणून घेऊन शिकण्याची त्यांची मानसिकता असते.
आजच्या काळात नवसमाज निर्मिती व समाज परिवर्तन अशी दुहेरी जबाबदारी शिक्षकांवर येऊन पडली आहे, विद्यार्थ्यांची व पर्यायाने भावी समाजाची विवेकबुद्धी जागृत करून ती कार्यप्रवण करण्याचे काम हे फक्त शिक्षकच करू शकतात. शिक्षकांसाठी गुरु जनांसाठी मी एवढेच म्हणू इच्छिते की शिक्षक जगतात अज्ञानाचा नाश करून समाजाला प्रकाशमान बनवितात.माझ्या आजपर्यंतच्या जीवनाच्या प्रवासात मला कळत नकळत ज्ञान देणाऱ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिकारी प्रा. डॉ. आर बी ढाके सहाय्यक कार्यक्रमाधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा डॉ संजय चौधरी यांनी केले डॉ.जगदीश चव्हाण विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.आर डी भोळे प्रा. डॉ.अनिल सावळे प्रा.संगीता धर्माधिकारी प्रा. डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.अंजली पाटील प्रा. डॉ.जयश्री सरोदे प्रा निर्मला वानखेडे प्रा श्रेया चौधरी, प्रा. एस डी चौधरी श्री प्रकाश सावळे उपस्थित होते असे प्रसिद्धी प्रमुख डॉ. संजय चौधरी कळवितात