शहापुर : शहापूर तालुक्यातील खर्डी विभागातील भोसपाडा येथे महिंद्रा लॉजीस्टिक लिमिटेड व सावली संस्थेच्यावतीने 123 आदिवासी शेतकर्यांना प्रत्येकी 10 फळ झाडांचे वाटपासह जवळच असलेल्या घाटाळपाडा येथे सावली संस्थेच्या वतीने बालवाडी सुरू करण्यात आली.
तिचे उदघाटन उपस्थित मान्यवर्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेड चे डॉ विजय पवार, निनाद फाटक, सचिन सोनवणे व भिवंडी येथील अनेक कर्मचारी व सावली संथेचे कर्मचारी तसेच टेंभा ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा आमले, सदस्य आनंद रोज, संगीता तातले, सामाजिक कार्यकर्ते रमेश दुभेळे, सीताराम रोज, पत्रकार अनिल घोडविंदे व जीवन दीप महाविद्यालयचे एन एस एस चे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.