मशीनमधील आईलचा पेट : लाखोंचे नुकसान
पिंपरी-चिंचवड : भोसरीतील इंडिया फोर्ज अँड ड्रॉप स्टॅम्पिंग लिमिटेड कंपनीमध्ये अचानक आग लागल्याने कंपनीतील दोन महागड्या मशीन जळून खाक झाल्या. ही घटना सोमवारी (दि. 10) सायंकाळी सहाच्या सुमारास बालाजी नगर येथे घडली. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भोसरी मधील बालाजी नगरमध्ये इंडिया फोर्ज अँड ड्रॉप स्टॅम्पिंग लिमिटेड ही कंपनी आहे. दीपक सूद हे या कंपनीचे मालक असून 1978 सालापासून ही कंपनी सुरू आहे. कंपनीमध्ये एकूण 70 कामगार काम करतात.
हे देखील वाचा
—
210 लिटर ऑईल
सोमवारी सायंकाळी कंपनीतील एका मशीनला अचानक आग लागली. या मशीनमध्ये 210 लिटर ऑइल होते. याबाबत अग्निशमन विभागाला साडेसहाच्या सुमारास सोनिया टाकसाळ यांनी माहिती दिली. माहिती मिळताच संत तुकाराम नगर आणि भोसरी अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. दोन फोम कॅनच्या साहाय्याने आग विझविण्यात आली. ही कामगिरी अशोक कानडे, मनोज मोरे, विनायक नाळे, अवधूत आल्हाट, नवनाथ शिंदे, नितीन कोकरे, प्रतीक जराट, दीपक साळवी यांच्या पथकाने केली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, 18 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.