भोसरी : येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने मुक्ती पर्व दिवसानिमित्त विशाल सत्संग सोहळा नुकताच उत्साहात झाला.
यावेळी कार्यक्रमात सेवादल संचालक प. पु. बाबासाहेब कमाले, सेवादल शिक्षक नितीन पन्हाळकर, मंगेश बडद, प्रियंका जाधव, शर्मा जी यांनी आपले विचार व्यक्त केले. सोहळ्याला भोसरी सेक्टरमधील चाकण, खेड, शिक्रापूर याठिकाणाहून 300 पेक्षा अधिक भक्तमंडळी एकत्र आले होते. दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी संत निरंकारी मिशन मुक्ती पर्व दिवस म्हणून साजरा केला जातो.