भोसरीतून लाखाच्या जीन्स, टी शर्ट चोरीस

0

भोसरी : कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातून जीन्स, टी शर्ट आणि अन्य कपडे चोरीला गेले. हा प्रकार आज (मंगळवारी) सकाळी भोसरीमधील सखुबाई गवळी उद्यानासमोर उघडकीस आली. राजन श्रीकृष्ण सिंग (वय 30, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पहाटे चारच्या सुमारास अज्ञात चार जणांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील 96 हजार 120 रुपये किमतीचे कपडे चोरून नेले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट होते. यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.