भोसरीत कीर्तन महोत्सवाचे आयोजन

0

7 ते 14 फेब्रुवारीदरम्यान ज्येष्ठ कीर्तनकारांची सेवा

भोसरी : भोसरीचे आमदार महेश लांडगे मित्र मंडळाच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त भोसरीत 7 ते 14 फेब्रुवारी 2018 दरम्यान भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सप्ताहात वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. भोसरी परिसरातील नागरिकांनी या कीर्तन महोत्सवाचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहनही आ. लांडगे यांच्यावतीने करण्यात आलेले आहे. या कीर्तन महोत्सवाचे यंदाचे हे 11 वे वर्ष आहे. महोत्सवात दररोज रात्री सात ते नऊ कीर्तन होणार आहे.

आठवडाभर मान्यवर कीर्तनकारांची हजेरी
भोसरी, लांडगे आळी येथील महेशदादा स्पोर्टस् फाऊंडेशन क्रीडांगण येथे 7 ते 14 फेब्रुवारी 2018 दरम्यान कीर्तन महोत्सव होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार असून, यावेळी महापौर नितीन काळजे, माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे, कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, विधी समितीच्या सभापती शारदा सोनवणे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता तापकीर, शहर सुधारणा समितीचे सभापती सागर गवळी, क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते, ‘क’ प्रभाग समितीच्या अध्यक्षा अश्‍विनी जाधव, ‘इ’ प्रभागाच्या अध्यक्षा भीमाबाई फुगे, ‘फ’ प्रभागाच्या अध्यक्षा साधन मळेकर आदी उपस्थित राहणार आहेत. बुधवारी (दि.7) औरंगाबादचे पोपट महाराज फरकाडे यांचे रात्री सात ते नऊ या वेळेत कीर्तन होणार आहे. गुरुवारी (दि.8) मुंबईचे यशवंत महाराज पाटील यांचे रात्री सात ते नऊ या वेळेत कीर्तन होणार आहे. शुक्रवारी (दि.9) तीर्थक्षेत्र आळंदी येथील ज्ञानेश्‍वर माऊली कदम महाराज यांचे रात्री सात ते नऊ या वेळेत कीर्तन होणार आहे. शनिवार (दि.10) जळगांव येथील ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर यांचे रात्री सात ते नऊ या वेळेत कीर्तन होणार आहे. रविवार (दि.11) नाशिक येथील पांडुरंग महाराज गिरी यांचे रात्री सात ते नऊ या वेळेत कीर्तन होणार आहे. सोमवार (दि.12) नाशिक येथील रामकृष्ण महाराज लहवितकर यांचे रात्री सात ते नऊ यावेळेत कीर्तन होणार आहे.

दररोज काकडा आरती, महिलांच्या भजनाचेही कार्यक्रम
मंगळवार (दि.13) बारामतीचे प्रमोद महाराज जगताप यांचे रात्री सात ते नऊ या वेळेत कीर्तन होणार आहे. बुधवार (दि.14) श्रीक्षेत्र पंढरपूरचे दादा महाराज शिरवळकर यांचे रात्री सात ते नऊ या वेळेत कीर्तन होणार आहे. त्याचबरोबर टाळगाव, चिखलीतील संतकृपा भजनी मंडळ यांची दररोज पहाटे पाच ते सात या वेळेत काकडा आरती होणार आहे. सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत महिला संगीत भजनचा कार्यक्रम होईल. सायंकाळी साडेपाच ते साडेसहा हरिपाठ होणार आहे. काल्याच्या कीर्तनाला महापौर नितीन काळजे, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार महेश लांडगे, नगरसेवक राहुल जाधव, कुंदन गायकवाड, वसंत बोर्‍हाटे, संतोष लोंढे, नितीन लांडगे, विलास मडिगेरी, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, राजेंद्र लांडगे, संजय नेवाळे, नगरसेविका हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, यशोदा बोईनवाड, सारिका लांडगे, योगिता नागरगोजे, अश्‍विनी बोबडे, स्वीनल म्हेत्रे, सारिका बो-हाडे, सुवर्णा बुर्डे, सोनाली गव्हाणे, नम्रता लोंढे आदी उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवाच्या आयोजनात महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशन, पठारे-लांडगे तालीम मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, वैष्णव विचार कीर्तन महोत्सव समिती, भोजेश्‍वर मित्र मंडळ, माळी-आळी मित्र नामस्मरण भजनी मंडळ, जय हनुमान मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, श्री संत सावता माळी महाराज प्रतिष्ठाण यांनी पुढाकार घेतला आहे.