भोसरीत घरफोडी

0

भोसरी : बंद सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्याने कपाटातील 2 लाख 72 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नला. ही घटना शुक्रवारी (दि. 26) रात्री एक ते तीनच्या दरम्यान भोसरी गव्हाणेवस्ती येथील रामनगर सोसायटीत घडली. एका 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने भोसरी ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अनोळखी चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कामानिमित्त बाहेर गेले असताना, त्यांच्या बंद सदनिकेचे कुलूप तोडून, चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरुम मधील कपाटातील दोन लाख, 72 हजार, 200 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले.