भोसरीत जुगाराच्या अड्ड्यावर कुख्यात गुंडाकडून गोळीबार

0

पिंपरी : भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गवळी माथा परीसरात असणार्‍या जुगाराच्या अड्ड्यावर कुख्यात गुंडाने गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नाना लांडगे असे या कुख्यात गुंडाचे नाव आहे. नाना लांडगे हा येरवाडा कारागृहातून काही दिवसापुर्वीच सुटून आला होता. परीसरात दहशत माजवण्यासाठी नानाने हा गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. जुगाराच्या अड्ड्यावरील साहित्यांसह सोन्याची चैन न्यान्याने पळवली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.