भोसरीत देशी कट्टा जप्त

0

भोसरी : एका 22 वर्षीय तरुणाकडून देशी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई भोसरी एमआयडीसी पोलिसांनी लांडेवाडी चौकात केली. कुलदीप लालदेव चौहान (वय 22, रा. चक्रपानी वसाहत, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विजय दीपक दौंडकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.20) दुपारी चारच्या सुमारास भोसरी येथील लांडेवाडी चौक येथे एकजण पिस्तूल घेऊन उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कुलदीप याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा 20 हजार 200 असा ऐवज मिळाला. त्याच्याकडे याबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे याबाबत कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे आढळून आले. यावरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक आर.बी.बांबळे तपास आहेत.