भोसरी – जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कुदळवाडी येथील शाळेतील शिक्षिका व महिला कर्मचार्यांचा क प्रभागाच्या अध्यक्षा अश्विनी जाधव व नगरसेवक संजय नेवाळे यांच्या हस्ते गुरूवारी सत्कार करण्यात आला. यावेळी दिनेश यादव, राष्ट्रवादीचे आनंदा यादव, भाजपचे विजयराज यादव, दत्तात्रय बालघरे आदी उपस्थित होते. क प्रभागाच्या अध्यक्षा अश्विनी जाधव म्हणाल्या की, प्रत्येक क्षेत्रात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. विद्यार्थीनींनी ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने अभ्यास केला, तर यश नक्की मिळेल. शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब सगभोर व शिक्षकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक विठ्ठल बगाटे यांनी केले. सविता कावळे यांनी आभार मानले.