चिंचवड ः मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवून तसेच वारंवार फोन करून अश्लील भाषेत बोलल्याप्रकरणी एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार इंद्रायणीनगर भोसरी येथे घडला आहे. दिनेश सतीश नावंदर (वय 40, रा. चिखली) असे गुन्हा दाखल झाल्याचे नाव आहे. याप्रकरणी 55 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या मोबाइलवरून व्हॉट्सअपव्दारे फिर्यादी महिलेच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅपवर अश्लिल व्हिडीओ पाठविला. तसेच वारंवार फोन करून अर्वाच्य भाषा वापरून फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. 4 डिसेंबर 2019 ते 23 डिसेंबर 2019 या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी 18 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.