भोसरी एमआयडीसीतील कंपनीला आग

0

भोसरी : एमआयडीसीमधील हायटेक मेटल प्रोसेसर कंपनीला शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नसले तरी ही आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. भोसरी व पिंपरी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परंतु आग मोठ्या प्रमाणात असल्याने आणखी एका बंबाला याठीकाणी पाचारण करण्यात आले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवता आले.