भोसरी एमआयडीसीत एटीएम सेंटरचे उद्घाटन

0

भोसरी :- भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सह संपर्क प्रमुख मिलिंदराव देशपांडे यांच्या हस्ते भोसरी एमआयडीसीत एटीएम सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. जनसेवा सहकारी बँक लि. हडपसर पुणे या बँकेच्या भोसरी एमआयडीसी शाखेतील एटीएम सेवेला आज (सोमवार) पासून प्रारंभ झाला.

यावेळी महेश लांडगे म्हणाले, चार दशकांपेक्षा अधिक कालावधीपासून जनसेवा सहकारी बँक नागरिकांना सेवा देत आहे. त्याचसोबत आपल्या ठेवीदारांच्या हिताचा विचार करत सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे ठेवीदारांच्या मनात जनता सहकारी बँकेविषयी विश्वास कायम आहे, असेही त्यांनी बँकेच्या नवीन सेवेसाठी शुभेच्छा देताना म्हणाले,

यांची होती उपस्थिती
एटीएम सेंटरच्या उद्घाटन समारंभासाठी जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीए प्रदीप जगताप, पालक संचालक अॅड. सतीश गोरडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक जोशी, संचालक सूर्यकांत शिर्के, संदीप सारडा, विनायक गायकवाड, अनुपमा कळसकर, आशा बहिरट, बाळासाहेब कचरे, रवी तुपे, शाखा व्यवस्थापक विलास लांडगे, नगरसेवक बाबू नायर, सीताराम शेट्टी, संदीप जाधव, राजेश भुजबळ, रवींद्र नामदे, सुनीता पाटसकर, शिवसेना उपशहर प्रमुख गजानन चिंचवडे, भाजप प्रवक्ते अमोल थोरात आदी उपस्थित होते.