भोसरी महोत्सवात यंदा लावणीचा तडका

0
भोसरी : गणपती उत्सवानिमित्त भोसरी कला क्रीडा मंचतर्फे 16 ते 19 सप्टेंबर या कालावधीत ‘भोसरी महोत्सव’ आयोजित केला आहे. महोत्सवात नाटक, कवी संमेलन, आंतरशालेय नृत्य स्पर्धा, मिस पिंपरी-चिंवचड स्पर्धा, लावणी असे कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंचचे अध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. नितीन लांडगे व विजय फुगे यांनी दिली. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सर्व कार्यक्रम होतील. भोसरी शहराची कला व क्रीडा क्षेत्रात नव्याने ओळख निर्माण व्हावी, पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने महोत्सव भरवला जातो.