नगरसेवक रवी लांडगे यांचे नेतृत्व
भोसरी- भोसरी रुग्णालय खासगीकरणाला विरोध करत भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भोसरीत गुरुवारी 28 रोजी महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चामुळे भोसरीत महापालिक ा प्रशासनाविरोधी लाट तयार झाली आहे. त्याचा महापालिका प्रशासनाने चांगलाच धसका घेतला आहे. हा मोर्चा काढणार असल्याचे समजताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने या रुग्णालयात पालिकेचे बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णालयाचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होऊ देणार नाही. सत्तेत भाजप असले तरी भाजपच्या चुकीच्या क ामाला माझा विरोध कायम राहिल, अशी भूमिका नगरसेवक रवी लांडगे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
आयुक्तांना निवेदनपिंपरी-चिंचवड महापालिकेने भोसरीत रुग्णालय बांधले आहे. हे रुग्णालय खासगी तत्वावर चालविण्यास देण्याचा ठराव आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी केला होता. त्याला सर्वसाधारण सभेची मंजुरी देखील घेण्यात आली. त्याला भाजपचे समर्थन मिळत असल्याने भोसरीतील भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांनी भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध दर्शविला होता. येवढ्यावर प्रशासनाचा निर्णय बदलत नसल्यामुळे त्यांनी भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरण विरोधात महामोर्चा काढला.
आज त्यांच्या मोर्चाला नागरिकांतून मोठा प्रतिसाद मिळाला. मोर्चा काढल्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. मोर्चाला विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पाठिंबा दर्शविला होता.विरोधकांची उपस्थितीआयुक्तांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या दालनात पत्रकार परिषद घेवून माहिती सांगितली. आयुक्तांना भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण होऊ नये, यासाठी हा मोर्चा क ाढला आहे. पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या कामाबाबत मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याकडे देखील तक्रारी केल्या आहेत. आता आयुक्त भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण कसे करतात, हेच मला बघायचे आहे. लाखो सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले रुग्णालय खासगी ठेकेदाराला विकण्याचा त्यांचा डाव हाणून पाडणार आहे. सर्वसाधारण सभेत खासगीकरणाबाबत के लेला ठराव विखंडीत करेपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे, असे लांडगे यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, राहूल शिंदे आदी उपस्थित होते.