भोसरी ः शिवसेनेचा भोसरी विधानसभा मतदारसंघ भाजपकडे गेल्याने शिवसेनेची भुमिका ठरविण्यासाठी शहरातील शिवसेना पदाधिकार्यांची बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत चांगलाच राडा झाला. यावेळी एका महिला पदाधिकार्याच्या कानशिलात लागावण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. भोसरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा होता. त्यानुसार शिवसेनेच्या एका इच्छुकाने घरोघरी जाऊन जोरदार प्रचारही सुरू केला होता. मात्र, भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडे घेत विद्यमान आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शिवसेना पदाधिकार्यांत नाराजी पसरली आहे. दरम्यान, याबाबत शिवसेनेची भुमिका ठरविण्यासाठी इच्छुक उमेदवाराच्या कार्यालयात बैठक आयोजित केली होती. मात्र, यामध्ये बैठक मतभेद झाल्याने गोंधळ निर्माण झाला. एका पदाधिकार्याने माजी खासदारांबाबत वादग्रस्त विधान केल्याने एका महिला पदाधिकार्याची व त्या पदाधिकार्यात चांगलीच जुंपली. त्याचे रूपांतर हमारातुमरीला येत महिला पदाधिकार्याच्या कानशिलात लगावण्यात आली, असे सुत्रांनी सांगितले. हे प्रकरण पोलिसांत गेले असून त्या पदाधिकार्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. हा पदाधिकारी भोसरीतील एका नगरसेवकाचा सासरा असल्याचेही सांगितले जात आहे.
हे देखील वाचा