भिवंडी-निजामपूर पालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांचे संकेत
भिवंडी । भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रात वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधू इच्छिणार्या लाभार्थी यांच्यापैकी अनेक लाभार्थी यांना अद्याप शासनाकडून निधी मिळालेला नाही. लाभार्थ्यांना लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊन स्वच्छतागृहे बांधून घेण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. लाभार्थ्यांना येणार्या अडचणी दूर कराव्यात या कामात भ्रष्टाचार केल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी कर्मचार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती भिवंडी महापालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.
भारत सरकारच्या स्वच्छता अभियानाअंतर्गत भिवंडी महापालिका कार्यक्षेत्र हगणदारीमुक्त करण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतागृहांची योजना राबविण्यात आलेली आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हे
प्रशासनाकडून संबंधित विभागाकडून उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक लाभार्थ्यास स्वच्छतागृह बांधण्यासाठी १७ हजार रूपये देण्यात येतात. या योजनेतंर्गत ५ हजार ८५६ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली व निधीही देण्यात आला. मात्र त्यापैकी केवळ १ हजार ७९५ लाभार्थींनी वैयक्तिक स्वच्छतागृह बांधून त्याचा वापर सुरू केला.
३ हजार ८७८ लाभार्थी यांना ६ हजारांचा पहिला हप्ता घेऊन त्यांनी स्वच्छतागृहाचे काम सुरू केले नाही २७१ लाभार्थींनी शासनाची रक्कम परत केली. तर ४४ लाभार्थींनी शासनाची रक्कम घेऊन बांधकाम न करता अपहार केला. या प्रकरणी संबंधित प्रभाग अधिकार्याने विविध पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत.