भ्रष्टाचार निर्मुलन संघाचे झेडपी समोर उपोषण

0

जळगाव । बोदवड तालुक्यातील मुक्तळ येथील ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामरोजगार सेवक म्हणून कार्यरत असणारे अरुण पारधी यांने अनेक शासकीय योजनांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले असतांनाही त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने भ्रष्टाचार निर्मुलन जनहीत संघ (भारत)च्या वतीने जिल्हा परिषद भवनसमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव इंगळे, संतोष लोणे, दादाराव वाघ, रत्नाकर जोहरे, करण सपकाळे, अशोक सुरवाडे, योगिराज साळुंखे, कडू बावस्कर, सचिन सोनवणे, महेश विसपूते, पौर्णिमा फेगडे, आशा पाटील, रोहीणी नेहेते, माया सुरवाडे, मंगला रत्न आदी उपोषणास बसले आहे. पारधी याने यावल येथील आदिवासी प्रकल्प विभांगातर्गत जागा नावे नसतांना आई सरपंच असतांना पदाचा दुरुपयोग करुन घरातील तीन लोकांना बोगस उतारे तयार करुन शासनाची फसगत केली आहे. रोजगारहमी योजनेंतर्गत शौचालय न बांधता रकमेचा अपहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.