पुणे । भारतीय समाजाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला, विद्यार्थ्याला भ्रष्टाचारमुक्त भारत मोहिमेचा शिपाई व्हावे लागले तरच ही कीड नष्ट होईल असे मत कर्मचारी भविष्य निधी संगठनचे आयुक्त अरुणकुमार यांनी व्यक्त केले.
‘मेरा लक्ष्य भ्रष्टाचार मुक्त भारत’ या उपक्रमाअंतर्गत एस.एम. जोशी हिंदी विद्यालयात चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपायुक्त कांबळे, धनंजय मोहिते, बोरकर विद्यालयाच्या प्राचार्या शोभा कमलाकर, आबा गायकवाड, शैलजा दिवटे, पोपट भोसले आदी उपस्थित होते.याप्रसंगी वक्तृत्व स्पर्धेतील तुषार चौहान (प्रथम), सिरवी (द्वितीय), रितिका ओझा (तृतीय), दीक्षा तिवारी (उत्तेजनार्थ) तर चित्रकला स्पर्धेतील राकेश सोनार, ज्योती डाबी आदी विद्यार्थ्यांना अरुणकुमार यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. कमलाकर यांनी सांगितले की, भ्रष्टाचाराच्या रोगाला थांबविण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न झाले पाहिजे. समाजातील प्रत्येक नागरिकाने मनापासून स्वच्छ आचारणाची सुरुवात केली पाहिजे. चित्रकला स्पर्धेचे नियोजन पोपट भोसले, वक्तृत्व स्पर्धेचे नियोजन शैलजा दिवटे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन दुर्गाडे यांनी केले.