मँचेस्टर सिटीला पराभवाचा धक्का

0

मोनॅको । लीग लढतीत 5-3 असा विजय मिळवूनही मँचेस्टर सिटीला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयश आले.

उप-उपांत्यपूर्व फेरीच्या परतीच्या लढतीत यजमान मोनॅकोने 3-1 असा विजय साजरा करताना गोलसरासरी 6-6 अशी बरोबरीत आणली. संघाच्या मैदानावर तीन गोल करण्याचा फायदा मोनॅकोला झाला.