अमळनेर । दिड दिवसीय, पाच दिवसीय, सात दिवसीय, दहा दिवसी, बारा दिवसीय गणरायाचे विसर्जन होत असल्याचे आज पर्यत ऐकीवात आहे. मात्र अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथे अनोख्या पध्दतीने गणपतीने गणपती दिवसर्जन केले जाते. या ठिकाणी आठव्या दिवशी श्री गणेशाचे विसर्जन होते. आठव्या दिवशी गणरायाला निरोप देण्याची आगळी वेगळी परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. या परंपरेला सुरु ठेवत गावातील तरुणमंडळीने यंदाही आपल्या लाडक्या बाप्पाला आठव्या दिवशी निरोप दिला. यावर्षी गावातील 14 सार्वजनिक मंडळांनी गणरायाची स्थापना केली होती. पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आश्वासन घेऊन शुक्रवारी वाजत गाजत उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पांचा निरोप घेतला.
विविध कार्यक्रमाचे आयोजन
विसर्जनाच्या दिवशी सकाळ पासून आरतीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन गणेश मंडळाकडून करण्यात आले होते. हे कार्यक्रम पार पडल्यावर सायंकाळी 4 वाजेपासून गणरायांच्या निरोपाच्या तयारीला सर्व भक्तगण लागले. सायंकाळी 6 वाजता गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणुकीला सुरुवात झाली. बॅण्ड पथके, ढोल, ताशांच्या गजरात गावातून बाप्पांची मिरवणुक काढण्यात आली.
शिस्तीत मिरवणूक
गावातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुकीत सहभागी होत अतिशय शिस्तबंध पध्दतीने मिवणूक पार पाडला. चौदा सार्वजनिक मंडळाचे 14 बँन्ड पथक देखील या निरवणुकीत सहभागी झाले होते. अशा ह्या ढोल ताशा व बॅड पथकाच्या जल्लोषात गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी गणेश भक्तांमध्ये चांगलाच उत्साह संचारला होता.
पावसामुळे आनंद द्विगूणीत
यंदा जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद अमळनेर तालुक्यात झाली आहे. त्यामुळे गणपती बाप्पांच्या कार्यक्रमावरही याचा परिणाम होईल असे वाट होते. मात्र, बाप्पावर असलेल्या श्रध्देवर याचा परिणाम न होता मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात आल. मात्र शेवट्या दिवशी पाऊसाचे आगमन व्हावे असे सर्वांचे मत होते अन् मिरवणुकीला सुरवात झाल्यानंतर काही मिनिटातच वरुणराजाने हजेरी लावल्याने गणेश भक्तांचा आनंद द्विगुणीत झाला होता.