अमळनेर । प्रवाह आपल्या जीवनाच्या विरुद्ध दिशेने असेल तर प्रामाणिक पणे आणि जिद्दीने प्रवास केल्यास आपणास यश निश्चित मिळते आणि ते समाजात चकाकून दिसते असे प्रतिपादन आमदार स्मिता वाघ यांनी मंगरूळ येथील जिल्हा परिषद शाळेत डिजिटल शाळा उपक्रमांतर्गत लोकसहभागातून संगणक संच भेट कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात केले. मुंबई येथील तरुण उद्योजक भैय्यासाहेब रणदिवे यांनी जि प शाळेला संगणक संच भेट दिला त्यावेळी आमदार वाघ पुढे म्हणाल्या की, भैय्यासाहेब रणदिवे यांनी शिक्षक संजय पाटील यांच्या गुरुदक्षिणेची मागणी म्हणून विद्यार्थ्यांसाठीच ज्ञानोपयोगी साहित्य कै.दादासो अंबर राजाराम पाटील माध्यमिक व जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिले हि खरोखर कौतुकास्पद सांगत जि.प.शाळेला कंपाऊंड बांधून देण्याचे आश्वासन हि दिले.
कार्यक्रमासाठी यांची होती उपस्थिती
झांबरे पाटील म्हणाले की, काळानुसार शाळांनी कात टाकणे गरजेचे आहे त्यासाठी लोकसहभाग गरजेचा आहे. संजय पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे तुम्ही यशाच्या शिखरावर पोहचाल. यावेळी चित्रपट दिगदर्शक विनोद गुप्ता ,राकेश पाटील, दीपक पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन आभार मुख्याध्यापक शशिकांत गोसावी यांनी मानले शाळेचे तीन वर्ग डिजिटल झाल्याची माहिती देऊन ग्रामस्थ आणि दानशूर व्यक्तींनी संपूर्ण शाळा डिजिटल करण्यासाठी मदतीचे आवाहन हि त्यांनी केले. यावेळी तुकाराम पाटील, ज्योती बोरसे, वैशाली सोनवणे, राज्ञी लांडगे, योगिता पाटील, शीतल पाटील, चेतना बिर्हाडे उपस्थित होते.