मंगरुळ विकासोमध्ये 13 जागा बिनविरोध

0

चोपडा। तालुक्यातील मंगरुळ गावात राजकारणी मंडळींना ग्राम पंचायत असो अथवा कोणतेही विविध संस्था असो आजतागायत बिनविरोध करण्यासाठी करण्यास अपयश येत होते. परंतु गावाच्या प्रथम नागरिक म्हणून ज्याचाकडे बघितले जाते ते असतात सरपंच गावाच्या एकोपा हा महत्त्वाचा दुवा मानला जातो, प्रत्येक गावात राजकारण असते मात्र संस्थेच्या आर्थिक खर्च वाचवुन मंगरुळ विकासोला तिन गावांचा समावेश येतो या तिन्ही गावांचा सभासदांना विश्वासात घेऊन गेल्या 50 वर्षात प्रथमच हि संस्था बिनविरोध करण्यासाठी अहोराञ मेहनत घेऊन सरपंच अतुल भिमराव ठाकरे यांनी तालुक्यात आदर्श निर्माण करून दाखवला.

खेळीमेळीच्या वातावरणात झाली निवड
जनरल 8, स्त्री राखीव 2, ओबीसी 1, जाती जमाती 1, व 1 इतर या 13 जागांवर मंगरुळ विकासोची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच संस्था बिनविरोध झाल्याचे सहाय्यक निबंधक मधुसुदन लाटी यांनी सांगितले. बिनविरोध नवनिर्वाचित संचालक अतुल ठाकरे, दिलीप निकम, प्रकाश ठाकरे, धनराज पाटील, जयवंत पाटील, शालीग्राम पाटील, दिलीप ठाकरे, सुपडु धनगर, कैलास सपकाळे, अभिमन ठाकरे, आशा ठाकरे, वत्सलाबाई पाटील, लिलाबाई निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.डी.पाटील यांनी काम पाहिले तर त्यांना विशेष सहकार्य संस्थेचे सचिव किशोर चव्हाण यांनी मदत केली. प्रेमलाल पाटील, सुधाकर ठाकरे, मुरलीधर ठाकरे, छोटु पाटील, रमेश ठाकरे, राकेश ठाकरे, जयराम ठाकरे, दिनकर ठाकरे, नवल कोळी,नानाजी पाटील आदींनी सरंपच अतुल ठाकरे यांनी परीश्रम घेतले.