मंगरूळ ग्रामपंचायतीत विद्युत ग्राहक मेळावा

0

अमळनेर । तालुक्यातील मंगरूळ ग्रामपंचायत व महाराष्ट्र वीज मंडळ उपविभाग अमळनेर ह्यांचे वतीने विद्युत ग्राहक मेळावा घेण्यात आला. सदर मेळाव्यात अमळनेर उपविभागाचे सहाय्यक अभियंता व्ही.पी.जोगी, श्री.सरोदे, मंगरूळ सरपंच अनिल पाटील हे उपस्थित होते.

मेळाव्यात ग्राहकांच्या, वाढीव वीजबिल, बंद मीटर, अवाजवी वीज आकारणी, शेतीच्या कमी हॉर्सपॉवर मोटारीच्या बिलात जास्त हॉर्सपॉवर वीज आकारणी, विज चोरीसाठी आकोडे टाकणार्‍यांवर कारवाई, गरजूंना तातडीने मीटर जोडणी अर्ज भरून वीज कनेक्शन देण्यात आले. ओकोडे वीज चोरी बंद करून नागरिकांसाठी उपयोगी व समस्या निराकरण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.