मंगरूळ पीरच्या इसमाची धरणाखाली आत्महत्या

0

रावेर- तालुक्यातील मंगरूळ येथील 42 वर्षीय इसमाने 31 रोजी सकाळी सात वाजेपूर्वी मंगरूळ धरणाच्या खाली वडाच्या गळफास घेऊन आत्महत्या केली. पठाणसिंग छगन बारेला (42, रा.मंगरूळ, ता.रावेर) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी रावेर पालिसात
कैलास पठाण बारेला (22, रा.मंगरूळ, ता.रावेर) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक विलास तायडे करीत आहेत.