मंगरूळ येथील विद्यालयात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

0

अमळनेर : जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने कै.दादासो अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालय मंगरूळ येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक गटात लोकमान्य विद्यालयाचा हितेश पाटील तर प्राथमिक गटात एकात्मता माध्यमिक विद्यालय शहापूरची यशोदा चव्हाण प्रथम आले आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक प्रकाश पाटील तर प्रमुख पाहुणे संघटनेचे तालुकाध्यक्ष भास्कर चौधरी, टी.डी.एफ. संघटनेचे कौन्सिल सदस्य पी डी पाटील,अरुण पाटील,पी एस शंखपाल होते.अध्यक्ष व अतिथींच्या हस्ते सरस्वती पूजन झाले.

माध्यमिक गटासाठी ‘माहिती तंत्रज्ञानाची ताकद’हा विषय होता. द्वितीय – दिव्येश पाटील (सानेगुरुजी विद्यालय), तृतीय-विशाखा निकम (डी.आर.कन्या), तर उत्तेजनार्थ – निर्भय सोनार (लोकमान्य), वरोळे भीमराव (सानेगुरुजी) यांनी बक्षीस मिळवले. प्राथमिक गटासाठी ‘जीवनदायी आई’ हा विषय होता. यात द्वितीय-चेतना डागा (डी.आर. कन्या), तृतीय-चैताली पवार (के.डी. गायकवाड), उत्तेजनार्थ- सेजल चौधरी (लोकमान्य), प्रियंका बारी (लोकमान्य) यांनी बक्षीस मिळवले. प्रथम येणार्‍या दोघांची जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. परीक्षक म्हणून संजय पाटील, रुपाली ठाकूर यांनी काम पाहिले. यावेळी अशोक वाघ, शैलेश काळकर, यशोदीप पाटील राजेंद्र पाटील, शशिकांत कापडणीस, सुषमा सोनवणे, सीमा मोरे, शीतल चव्हाण, प्रवीण पाटील, मनोज पाटील, राहुल पाटील, सुदर्शन पवार, प्रदीप पाटील, सुनील कुंभार हजर होते. सूत्रसंचालन व आभार एस.के. पाटील यांनी केले.