अमळनेर प्रतिनिधी। तालुक्यातील मंगरूळ येथे चोरट्यांनी घरासह मेडिकल स्टोअर फोडून रोख लांबविल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.
मंगरूळ येथे हर्षल धर्मराज सैंदाने यांचे मेडिकल दुकानचे शटरचे कुलूप कटर ने कापून दुकानातील ३७ हजार रुपये रोख आणि चांदीची लक्ष्मीची मूर्ती अज्ञात चोरटयाने चोरून नेली. तर समोरच असलेले पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील यांचे घर ही चोरटयाने कुलूप कटरने कापून दुसर्या मजल्यावरील कपाटातील वस्तू चोरून नेल्या. या प्रकरणी हर्षल सैंदाने यांच्या फिर्यादीवरून भादवी ४५७, ३८० प्रमाणे अज्ञात चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एएसआय सुभाष साळुंखे करीत आहेत.