मंगल कार्यालयातून दोन लाखांची चोरी

0

पिंपरी-चिंचवड : ताथवडे येथे मंगलकार्यालयात सुरु असलेल्या लगीन घाईचा फायदा घेत चोरट्याने महिलेची पर्स पळवून सुमारे दोन लाखांची चोरी केल्याचे उघड झाले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 12) सकाळी आठ ते दुपारी दोनच्या सुमारास घडली. राजेंद्र रामचंद्र महाडीक (वय 54 रा. ज्योतीबानगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दिली आहे.

रघुनंदन कार्यालयातील घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताथवडे येथील रघुनंदन मंगल कार्यालयात पाहुण्याच्या लग्नाला गेले असता महाडिक यांच्या पत्नीने त्यांची पर्स मंगल कार्यालयाच्या एका खोलीत ठेवली होती. मात्र काही कामानिमित्त त्या खोलीतून बाहेर गेल्या असता चोरट्याने पर्सवर नजर ठेऊन ती पर्स पळवली. या पर्समध्ये 1 लाख 52 हजार रुपये रोख व दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण, तीन कानातले असे 42 बजार रुपयांचे सोन्याचे दागीने असा एकूण 1 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लग्न मांडवातूनच पळवल्याने लग्नात एकच चर्चा होती.पोलीस मंगल कार्यालयातील सीसीटीव्हीचा तपास करत असून पोलिसांनी लग्न समारंभाला जात असताना आपल्या किंमती ऐवजाची काळजी घ्यावी असे आवाहन नागरिकांना व विशेषतः महिलांना केले आहे.