मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा…

0

भुसावळ । महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त 1 मे रोजी तहसील व नगरपालिका कार्यालयासह शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.

पंचायत समिती
येथील पंचायत समिती कार्यालयात सभापती सुनिल महाजन यांच्याहस्ते सकाळी 7 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी सुभाष मावळे, एस. डी. पाटील, डॉ. दवंगे, दलितमित्र लालाजी ढिवरे, शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे, कृषी विस्तार अधिकारी पी. एल. धांडे, एन. डी. दांडगे, किशोर तायडे, सुनय कोळी, एम. आर. जोशी, हिरासिंग चौधरी, उमेश सोनवणे, कल्पना रावळ, रागिणी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

भुसावळ बसस्थानक
येथील बसस्थानकावर महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण सकाळी 7.30 वाजता आगारप्रमुख एच. डी. ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रकाश भोई, सुनिल पाटील, नंदू चौधरी, सहारे, पिंटू चौधरी, कॅशिअर हरीभाऊ भारंबे, सतीष जैसवाल, नारायण पाटील, युसूफ शेख, सुर्यवंशी (वाहन पर्यवेक्षक), विकास चौधरी, सोनवणे, प्रविण ठोके, एस. आर. पाटील आदी उपस्थित होते.

भुसावळ नगरपालिका
येथील नगरपालिकेत सकाळी 7 वाजता नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याहस्ते ध्वजरोहण करण्यात आले. प्रसंगी मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, पाणी पुरवठा सभापती किरण कोलते, नगरसेवक मुकेश गुंजाळ, नगरसेवक प्रा. दिनेश राठी व नगरसेवक यांच्यासह नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तहसील कार्यालय
येथील तहसील कार्यालयात आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर, नायब तहसीलदार संजय तायडे, गटविकास अधिकारी सुभाष मावळे, नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक किरण कोलते, वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती फलटणकर, पंचायत समिती सभापती सुनिल महाजन, दलितमित्र लालाजी ढिवरे, पीआरपीचे राजु डोंगरदिवे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, नगरसेवक अ‍ॅड. बोधराज चौधरी, तलाठी एन. आर. ठाकूर यांच्यासह असंख्य मान्यवर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर व नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

शहर पोलिस ठाणे
शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक वसंत मोरे यांच्याहसते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी दलितमित्र लालाजी ढिवरे यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

बाजारपेठ पोलिस ठाणे
बाजारपेठ पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, एएसआय व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

तालुका पोलिस ठाणे
तालुका पोलिस ठाण्यात महाराष्ट्रदिनानिमित्ता परिविक्षाधिन सहायक पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, एएसआय व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय
येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात सहायक पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांच्याहस्ते सकाळी 7.45 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत मोरे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, तालुका पोलिस ठाण्याचे परिविक्षाधिन सहायक पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक मारोती मुळूक व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

आयुध निर्माणीत कामगार दिन
आयुध निर्माणी कामगार युनियनतर्फे कामगार दिवस साजरा करण्यात आला. सुरुवातीला कामगार भवन प्रांगण, पोस्ट ऑफीसपासून भव्य रॅली काढण्यात आली. युनियनचे कार्याध्यक्ष किशोर पाटील यांच्यासह मंचावर पी. बी. महाजन, आनंद रंधे, पी. बी. सपकाळे, रेखा आव्हाड यांनी ध्वजारोहण केले. दिपक भिडे, किशोर रिल, किशोर पाटील यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन गजानन इंगळे यांनी केली. प्रास्ताविक गोपाळ सुरडकर यांनी केले.

यशस्वीतेसाठी प्रवीण पाटील, गिरीश येवले, दिपक वाघ, प्रवीण मोरे, गिरीश येवले, राजेंद्र जैन, योगेश अंबोडकर, प्रवीण डी. पाटील, प्रविण बार्हे, जितू अंबोडकर, आशिष मोरे, विनोद धाडे, निलेश देशमुख, हिरालाल पारिसकर, महेंद्र पाटील, पंकज सोनार, पंकज विसपुते, बालू जोनवाल, महेंद्र पाटील, शैलेश पवार, अरुण पाटील, प्रविण पाटील, राजू तडवी, प्रसाद भावसार, महेश देशमुख, इच्छाराम सपकाळे, रवि सपकाळे, दीपक भिडे, महेंद्र पाटील, जितेंद्र मोरे, रितेश तायडे, निशांत राठोड, पंकज बडगुजर, लतेश वरुलकर, संजय पाथरवट, संतोष बाविस्कर, राजू तडवी, संजय पथरवाटी, मोहन सपकाळे, इस्माइल तडवी, शेख शकील, मिलेश देवराले, मिलींद अडकमोल, चंदू वायकोळे, धनंजय पिंपले, स्वप्निल वराडे, नितीन शिवरामे, सुमित रंधे यांनी परिश्रम घेतले. राजेंद्र झा अध्यक्ष कामगार युनियन व उपाअध्यक्ष एआयडीईएफ यांचे मार्गदर्शन लाभले.

खिर्डी खुर्द ग्रामपंचायतीत ध्वजारोहण
येथील ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. खिर्डी खुर्द ग्रामपंचायत सरपंच ज्योती रमेश कोळी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच निळकंठ बढे, खिर्डी पोलीस पाटील प्रदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य पवन चौधरी, उज्वला लढे, निता किरंगे, चारु नेहते, तेजस्विनी सुपे, सी.ए. पाटील, रवींद्र कोचूरे, नेरकर, भोई, कर्मचारी जितेंद्र फालक, योगेश कोळंबे, योगेश नेहते उपस्थित होते.

खिर्डी उर्दू शाळा
येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शेख इम्रान यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख अलताफ शेख बशीर तसेच शाळेतील मुख्याध्यापक अहमद खान समद खान, उपशिक्षक आदिल खान, अनीस खान, एजाज अहमद, जावीद खान उपस्थित होते. शेख अलताफ यांनी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. याप्रसंगी पालकांची देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.