अमळनेर – येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरातील अद्ययावत बुकींग काउंटरचे उद्घाटन अंगारकी चतुर्थीला आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी अनिताताई चौधरी, सेंट्रल सीआयडीचे उपअधीक्षक जाधव, पंकज चौधरी, मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. येन. पाटील, सचिव एस. बी.बाविस्कर, खजिनदार गिरीष कुलकर्णी, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्थ अनिल अहिरराव व अनेक भाविक उपस्थित होते. येत्या आठवड्यात मंदिरात अभिषेक बुकिंग, देणग्या व महाप्रसाद कुपन वितरणासाठी देशातील मोजक्याच देवस्थानात असलेली आंतरराष्ट्रीय स्थराची प्रणाली कार्यान्वित होणार आहे. त्यासाठीच्या तयारीचाच एक भाग म्हणून मंदिरासमोर अद्ययावत काउंटर बनविण्यात आले आहे. यावेळी प्रसाद भंडारी यांनी पौरोहित्य केले.