मंगळग्रह संस्थानतर्फे १८० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0

अमळनेर- ग्रामीण भागात मुडी प्र.,डांगरी येथील प्राथमिक शाळेतील १८० विद्यार्थ्यांना मंगळग्रह संस्थानतर्फे शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले. अध्यात्मासोबत उपेक्षितांच्या मदतीला आल्याने ग्रामस्थांनी व शिक्षकांनी संस्थेचे आभार मानले आहेत.

६५० वह्या  वाटप

तालुक्यातील मुडी प्र., डांगरी जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शाळेत शुक्रवारी संस्थानातर्फे या साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या संगीताबाई भिल, संतोष चौधरी, संजय पाटील, चंद्रकांत पाटील, तापाबाई भिल, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय शिंदे, उपाध्यक्ष भगवान पाटील, सदस्य रामचंद्र पाटील, वाल्मिक चव्हाण रमेश सोनवणे, केंद्रप्रमुख मंगला पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच काशिनाथ माळी हे होते. सूत्रसंचालन स्वाती कदम यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले संस्थान कडून ६५० वह्या देण्यात आल्या.

यांचे लाभले सहकार्य

गतवर्षीही संस्थानाने वह्या वितरण केले होते. यावर्षी शहरातील शाळा व तालुक्यातीलएकमेव मुडी प्र डांगरी शाळेत या शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले यासाठी संस्थानचे अध्यक्ष दिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन.पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्थ अनिल अहिरराव, सेवेकरी सुनीता कुलकर्णी, यांच्या टीमने हि मदत दिली आहे. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक राजेंद्र कोळी, आर.के.पाटील, कविता पाटील, राज्ञी लांडगे, सतीश शिंपी, योगेश पिंगळे, भिकन पाटील यांनी सहकार्य केले.