मंगळवारपासून सुरत पॅसेंजर नियोजित वेळेवर धावणार

0

खासदार रक्षा खडसेंशी रेल्वे प्रशासनाशी चर्चा ; कटनी पॅसेंजरच्या विलंबाने प्रवाशांना मनस्ताप

भुसावळ- भुसावळ विभागातील चाकरमान्यांना जळगाव जाण्यासाठी कटनी पॅसेंजर सुरत पॅसेंजरच्या वेळेशी कनेक्ट करण्यात आली होती मात्र महिन्याभरापासून कटनी पॅसेंजर उशिराने धावत असल्याने सुरज पॅसेंजरचा खोळंबा होवून रेल्वे प्रवासी त्रस्त झाले होते. या संदर्भात सोमवारी खासदार रक्षा खडसे यांनी एडीआरएम मनोज सिन्हा यांची भेट घेत चर्चा केली. सुरज पॅसेंजरचा खोळंबा टाळण्यासाठी मंगळवारपासून ही पॅसेंजर नियमित वेळेवर म्हणजे 8.35 वाजता भुसावळ स्थानकावरून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रसंगी रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील, वरीष्ठ परिचलन प्रबंधक डॉ. स्वप्नील नीला, सहायक परिचलन प्रबंधक एम.जी.रामेकर आदींची उपस्थिती होती.

धुक्यामुळे कटनीला विलंब, प्रवाशांना मात्र मनस्ताप
गत महिन्यात रावेर आणि बोदवड भागातील चाकरमान्यांनी सुरत पॅसेंजर कटनी पॅसेंजर आल्यानंतर सोडण्याचा रेटा खासदारांकडे लावल्यानंतर रेल्वे प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर त्यास होकार देण्यात आला मात्र मुळातच धुक्यामुळे कटनी पॅसेंजर विलंबाने धावत असल्याने सुरज जाणार्‍या प्रवाशांसह भुसावळ भागातील चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सोसावा लागत असल्याच्याही तक्रार वाढल्या होत्या. दिल्लीकडून येणार्‍या एक्स्प्रेस व मेल गाड्या थंडी आणि धुक्यामुळे विलंबाने येत आहे, त्यामुळे कटनी पॅसेजर सुध्दा भुसावळ जंक्शनवर विलंबाने येते. त्यामुळे सरुत पॅसेजर सुध्दा विलंबाने धावते. त्यामुळे अन्य प्रवाशांना वेळेवर जळगाव येथे पोचता येत नसल्याने त्या प्रवाशांमधून ओरड वाढल्यानंतर मंगळवारपासून सुरत पॅसेंजर तिच्या नेहमीच्या वेळेवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोचेस फॅक्टरीला परवानगी आपल्यापर्यंत माहितीच नाही
भुसावळात कोसेच फॅक्टरीला मंजुरी मिळाल्याचे पत्र सोशल मिडीयात व्हायरल झाले, प्रसिद्धी माध्यमांपर्यंतही पोहोचले मात्र मी खासदार असतानाही मला त्याबाबत रेल्वे प्रशासनाने साधे कळवले नसल्याने खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.