मंगळवारी कृषी महाविद्यायाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन

0

शहादा । तालुक्यातील लोणखेडा येथील पुज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ संचलित कृषी महाविद्यालयाचा नुतन इमारत व प्रयोगशाळेच्या उद्घाटनाचा कार्यक्रमाचे आयोजन 29 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले आहे. या इमारतीचे उद्घाटन माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे, जैविक नियंत्रण प्रयोग शाळा क्रमांक एकचे उद्घाटन खा. रक्षा खडसे, जैविक नियंत्रण प्रयोगशाळा क्रमांक 2 चे उद्घाटन आ. चंद्रकांत रघुवंशी यांचे हस्ते होणार आहे.

अध्यक्षस्थानी राज्याचे रोजगारहमी मंत्री जयकुमार रावल राहाणार आहेत. या प्रसंगी आमदार उदेसिंग पाडवी माजी मंत्री पदमकार वळवी सस्थेचे अध्यक्ष दिपक पाटील सह मान्यवर उपस्थित राहाणार आहे. याप्रसंगी उपस्थितीचे आवाहन संस्थेचे दीपक पाटील, उपाध्यक्ष किशोर पाटील, मकरंद पाटील, पी.आर. पाटील यांनी केले आहे.