मंगळसुत्र चोरटा पोलिसांच्या ताब्यात

0

भुसावळ । शहरातील नाहाटा चौफुलीकडून घराकडे 15 जानेवारी महिला जात असतांना मागुन मोटारसायकलवर येणार्‍या अनोळखी व्यक्तीने मनीमंगळसुत्र बळजबरीने तोडून पळ काढला होतो. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलिस स्थानकात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी सै.शाकीर उर्फ गोलून सै. राशीद (वय-20, रा. 32, विवेकानंदर शाळेजवळ) याला अटक करण्यात आली आहे. या कामी पोनि याचे आदेशाने गुन्हाचा तपास स.फौ.आनंदसिग पाटील, पो.कॉ.विकास सातदिवे यांनी कारवाई केली.