मंगेशकर रूग्णालयात जाण्यासाठी डीपी रस्त्यावरून प्रवेश द्या

0

कोथरूड । दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा विस्तार वाढला असून, या ठिकाणी दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. रुग्णालयाकडे येणारा रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. यामुळे रूग्णालयात जाण्यासाठी डीपी रस्त्यावरून प्रवेश मिळावा, अशी मागणी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केली आहे.

मंगेशकर रूग्णालयासमोर अनधिकृत रिक्षा व खासगी वाहने लावल्याने अनेकदा अपघात होतात; तसेच रूग्णालयात वाहने येण्यासाठी एकच एवेशद्वार आहे. या ठिकाणी सेवासदन शाळा व सोसायट्या असल्याने विद्यार्थी, नागरिकांची सतत वर्दळ असते. रुग्णालयाच्या परिसरात अनेकदा वाहतूक कोंडीमध्ये रुग्णावाहिकांनाही अडथळा निर्माण होतो. यामुळे संबंधित विभागाने लवकरात-लवकर उपाययोजना करणे आवश्यक आहे. खर्डेकर म्हणाल्या, वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रूग्णालयात जाण्यासाठी मागील बाजूने प्रवेश मिळणे गरजेचे आहे. या ठिकाणचे भूसंपादन करून रस्ता व तेथील नाल्यावर पूल उभारावा. या भागातील नागरिकांच्या रहदारीचा महत्त्वाचा प्रश्‍न सुटणे आवश्यक आहे.