पुणे । दिवंगत व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या नावाने महापालिकेने कलादालन सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद दीपक मानकर यांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केली. व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, अभिनेते मधुकर तोरडमल, दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले अमरनाथ यात्रेतील यात्रेकरू, कवी दिलीप चित्रे यांना श्रद्धांजली म्हणून सभा तहकूब करण्यात आली.
सभासदांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मानकर यांनी बोलताना तेंडुलकर यांनी वाहतूक व्यवस्थापनाच्या मुद्द्यावर शहरात मोठी जनजागृती केल्याचे मानकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी बोलक्या रेषा अबोल झाल्याची भावना व्यक्त केल्या. मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी एक अस्सल पुणेकर गमावला असल्याचे सांगितले. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी तेंडुलकर यांनी मार्मिकपणे चित्र काढून लक्ष वेधून घेतल्याचे म्हटले. पुण्याची काळजी घेणारे एक चांगले व्यक्तिमत्व आपण गमावले आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी तेंडुलकर यांच्या जाण्याने शहराची कधीही न भरून येणारी हानी झाली असल्याचे म्हटले. कुंचल्याच्या एका फटकार्यात समाजाच्या मनाची उलथापालथ करण्याचे सामर्थ्य तेंडुलकरांच्यामध्ये होते अशा शब्दात आपल्या शब्दांत आदरांजली वाहिली, असे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी यावेळी सांगितले. आबा बागुल,गोपाळ चिंतल, माधुरी सहस्त्रबुद्धे, नंदा लोणकर यांची भाषणे झाली विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी वेळी आबा बागुल,गोपाळ चिंतल, माधुरी सहस्त्रबुद्धे, नंदा लोणकर यांची भाषणे झाली.
त्यांच्या स्मृती जपणार
ज्या शहराने नाव, प्रतिष्ठा दिली त्या शहरासाठी काम करणे हे कर्तव्य मानणारे तेंडुलकर होते, असे मत स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. महापालिका त्यांच्या स्मृतींचे जतन करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.