मुंबई : मंजुळा शेट्येच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे, तिच्या गुप्तांगावर कोणत्याही जखमा नाहीत असे तुरूंग प्रशासनाने कोर्टापुढे केलेल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे मंजुळावर लैंगिक अत्याचार झाले आहेत की नाही? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे. या प्रकरणातल्या दोषी तुरूंग अधिकार्यांवर कारवाईचे आश्वासन गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिले होते. मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणी शीना बोरा हत्याकांडातली प्रमुख आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने मंजुळावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. दरम्यान, इंद्राणी मुखर्जी हिने भायखळा तुरुंग प्रशासनावर केलेले आरोपांमध्ये सत्यता आढळली आहे. तिच्या स्वत:च्या शरीरावर जखमांचे व्रण आढळून आले आहेत. इंद्राणीचे मेडिकल रिपोर्ट गुरुवारी कोर्टात सादर करण्यात आला