पुणे : मिसेस महाराष्ट्र 2017, सिजन 2 ही सौंदर्यस्पर्धा नुकतीच उत्साहत पार पडली. यामध्ये उंची, व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, रॅम्पवॉक, इच्छाशक्ती, संवाद कौशल्य व परीक्षकांनी दिलेले गुण या निकषांच्या आधारावर मिसेस महाराष्ट्र 2017 ची निवड करण्यात आली. त्यामध्ये या कठीण निवड प्रक्रियेला पार करत मंजुषा मुलिक यांनी ’मिसेस महाराष्ट्र 2017’ चा किताब पटकवला. मिसेस महाराष्ट्र 2017 या सौंदर्य स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रीतील 250 सौंदर्यवतींनी भाग घेतला होता. त्यातील केवळ 20 स्पर्धक अंतीम फेरीमध्ये पोहचल्या. त्यातून मंजुषा मुलिक यांना मिसेस महाराष्ट्र म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेचे यंदा 25 वे वर्ष होते.