मंडपेश्‍वरचे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

0

मुंबई । मंडपेश्‍वर सिवीक फेडरेशनच्या टफ मेन आणि डार्क नाईट्स संघानी विजय मिळवत चेंबुर जिमखाना आयोजित चेंबुर जिमखाना बिलीयर्डस लीग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.

एमसीएफच्या टफ मेन संघाने दादर पारसी कॉलनी जिमखाना कामकाझी संघाचा 612-568 असा पराभव केला. संचित घेमावतचा पहिल्या फेरीत पराभव झाल्यावर रोहन जांबुसरीया आणि चंदू कांसोदरीयाने पुढचे सामने जिंकत संघाची आगेकूच कायम राखली.

अन्य लढतीत डार्क नाईट्स संघाने यजमान सीजी ग्लॅडीएटर्स संघाचे आव्हान 488-462 असे संपुष्टात आणले. ग्लॅडीएटर्सच्या लौकीक पाठारेने चांगली सुरुवात करत गोगरीचा पराभव केला.