भुसावळ प्रतिनिधी दि 2
येथील तालुका तलाठी संघातर्फे यावल तालुक्यातील बामणोद येथील कार्यरत मंडल अधिकारी बबिता चौधरी यांचेवर झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत तात्काळ संशयित आरोपीस अटक होण्याबाबत तहसीलदार भुसावळ यांना निवेदन देण्यात आले. पुकारलेल्या कामबंद आंदोलनात भुसावळ तालुका तलाठी संघटना संपूर्णपणे सहभागी झाली आहे. माहिती अशी की, बामणोद येथील कार्यरत मंडल अधिकारी बबिताचौधरी यांचेवर वाढोदा – शिरसाड रोडवर येथील अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या व्यक्तींनी लज्जास्पद कृत्य करून ट्रॅकर वरून ओढून खाली पडले व पाडले व जखमी केले तसेच जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला.
सदरील दुर्देवी आणि निंदनीय अशा घटनेतील गुन्ह्यातील संशयित आरोपी यांना तात्काळ अटक करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी भुसावळ तालुका तलाठी संघटना करण्यात आली. जोपर्यत या गुन्ह्यातील संशयितांना अटक होत नाही तोपर्यत जळगांव जिल्ह्या तलाठी संघटना यांचे आदेशानुसार पुकारलेल्या कामबंद आंदोलनात भुसावळ तालुका तलाठी संघटना संपुर्णपणे सहभागी झाली आहे.
सदरील गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपीना अटक होत नाही तोपर्यंत भुसावळ तालुक्यातील सर्व तलाठी, मंडल अधिकारी आणि तलाठी संवर्गातील अव्वल कारकून (ता. १) सप्टेंबर पासून कामबंद आंदोलन करीत आहेत. मा. तहसीलदार नीता लबडे यांनी आंदोलन कर्त्यांच्या सदरच्या भावना वरिष्ठांना कळवून सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी यांना तात्काळ अटक होऊन कठोरात कठोर शासन होईल यासाठी आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.