मंतरवाडी चौकातील वाहतुक कोंडी झाली नित्याचीच

0

मंतरवाडी चौकातील वाहतुक कधी सुरळीत होणार हा प्रश्न वाहनचालक आणि नागरीकांना सध्या खुपच भेडसावत आहे . कारण या ठिकाणी पुण्याच्या बाहेरून होत असलेली जड वाहतुक ही खुप मोठ्या प्रमाणात आहे . आणि नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणारे चालक तसेच हडपसर रोडवरील उड्डाणपुलाची असणारी कमी रूंदी आणि अशा वेळेत या पुलावर एखादे बंद पडणारे वाहन , या सर्व गोष्टीमुळे इथे कधी कोंडी होईल हे सांगता येत नाही .
वाहतुक कोंडी झाल्यानंतर किती वेळ वाहने जागेवरून हलनार नाहीत याला वेळेची काहीच मर्यादा नसते . ही कोंडी फोडण्यासाठी पोलीसांना खुप मोठी कसरत करावी लागते . पण अशा परिस्थीतीत जर एखादी रुग्णवाहीका अडकली तर प्रसंगी रुग्णाच्या जिवावर सुद्धा बेतू शकते . मागील काळात उरुळीमधील एका गोडाऊनला आग लागली असताना, अग्निशामक दलाची गाडी ट्रफिक जाममध्ये अडकली आणि तोपर्यंत ते गोडाऊन जळून खाक झाले . असे अनेक प्रश्न निर्माण होवु शकतात की जे जनतेच्या जिवाशी संबंधीत आहेत .
प्रशासन या समस्येवर कधी तोडगा काढणार याची वाट सध्या नागरिक पाहत आहेत . रस्त्यावरील अतिक्रमण हे तात्पुरत्या स्वरूपात काढले जाते . नंतर थोडयाच दिवसात परिस्थिती “जैसे थे ” होवुन जाते . ही वाहतुक कोंडी रोजचीच आहे . त्यामुळे स्थानिक “रोजचे मढे त्याला कोण रडे ” असेच म्हणताना दिसतात . पण या वाहतुक कोंडिचा प्रश्न प्रशासनास लवकरच तडीस लावावा लागणार आहे . कारण वाढत्या वाहनांची आणि वाहतुकीची परिस्थिती पाहता भविष्यात हा प्रश्न आणखी गंभीर स्वरूप धारण करणार असेच दिसते .