मुंबई: विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. काल बुधवारी मंत्रालयाच्या उपाहारगृहातील उसळीत चिकनचे तुकडे आढळून आल्याची घटना उघडकीस आली, त्यामुळे मंत्रालय परिसरात एकच चर्चा सुरु होती. मनोज लाखे या सरकारी अधिकाऱ्याने याबाबतची तक्रार केली. मंत्रालयाच्या उपहारगृहात मागवण्यात आलेल्या मटकीच्या उसळीमध्ये चिकनचे तुकडे आढळल्याची तक्रार लाखे यांनी केल्याचे वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात येत होते. याबाबत माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित करत संबंधित उपाहारगृहावर कारवाई करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री यांनी संबंधित उपाहारगृहाच्या स्वयंपाकगृहाची चौकशीचे आदेश दिले.
शाकाहारी व्यक्तीच्या भावनेशी हा खेळ सुरु असून यावर कारवाई व्हावी अशी मागणी अजित पवार यांनी केली.