मंत्रालयातील सारथीच्या बैठकीत गोंधळ; छत्रपतींचा अपमान झाल्याचा आरोप

0

मुंबई: मराठा समाज आरक्षण आणि वैद्यकीय प्रवेशाबाबतचे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. याबाबत अंतरिम आदेशाबाबत १५ जुलैला सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी आज सरकारतर्फे सारथीची बैठक आयोजित केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला मराठा समाजाचे समन्वयक उपस्थित होते. दरम्यान या बैठकीत गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.

छत्रपती संभाजीराजे यांना तिसऱ्या रांगेत बसविण्यात आले होते, यावर मराठा समाजाच्या समन्वयकांनी आक्षेप घेत गोंधळ घातला. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपतींच्या वारसांचा हा अपमान असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. परंतु संभाजीराजे यांनी आपल्याला प्रश्न सोडविणे आवश्यक असून मनापमान महत्त्वाचे नसल्याचे सांगत छत्रपती संभाजीराजे यांनी समन्वयकांची समजूत काढली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर ही बैठक पार पडली. मात्र मराठा क्रांती मोर्चाने या बैठकीवर बहिष्कार घातला.