मंत्रालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

0

मुंबई :- चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज मंत्रालयात मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी योगासने करुन सहभाग नोंदवला.

महाराष्ट्र शासन आणि द योग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, विविध विभागाचे सहसचिव, उपसचिव यांच्यासह मंत्रालयीन विभागांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यावेळी योगासने केली.